अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन !
  आणण भाऊंच्या  जीवनाची धगधगती ज्वाला आज निमाली. या 18 क्रमांकाला महाभारतात खूप महत्व आहे. 18 पर्व,18 अध्याय, 18 दिवस युद्ध, 18 अक्षौहिनी आदी. अण्णाभाऊ हे महाभारतकालीन कोणी पुराण पुरुष आहेत काय? अशी एक शंका मनात निर्माण होते. महर्षी व्यासांनी अण्णाभाऊंच्या रूपाने पुन्हा अवतार धारण केला काय ? असाही प्रश्न मनाला भुरळ घालतो. असो.
   अण्णाभाऊंच्या  साहित्याचे मूल्यमापन करावयाचे असेल, तर अण्णाभाऊंची तुलना जगातील श्रेष्ठ साहित्यिकांमध्ये अण्णाभाऊंची तुलना करावी लागेल, तेव्हाच अण्णाभाऊंचे खरे मोजमाप होऊ शकेल.
     मराठी साहित्याचा तुरा आणि महाराष्ट्राचा हिरा असलेल्या अण्णाभाऊंनी सर्वाधिक, समृद्ध आणि सर्व व्यापी साहित्य लिहिले, असे अन्य कोणाही साहित्यकाराने आजवर लिहिले नाही. हे अण्णाभाऊचे वेगळेपण आणि श्रेष्ठत्व आहे.  कादंबऱ्या 25, कथा संग्रह 30, लोकनाट्ये 15, वगनाट्ये 12, लावणी 100, गीते 50 आदी विविध साहित्य प्रकारचे वाङ्मय निर्माण करणारे अण्णाभाऊ हे एकमेव साहित्यिक आहेत. अनाभाऊंना दलित साहित्यिक न म्हणता वैश्विक साहित्यिक म्हणावयास हवे कारण अनाभाऊंच्या साहित्याला जातीपातीच्या भिंती नव्हत्या, तशा देशाच्याही मर्यादा नव्हत्या. अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यात मनुष्याचे दुःख दारिद्य्र, अज्ञान, शोषण यांवर प्रकाश झोत टाकलेला आहे. हे अण्णाभाऊंच्या साहित्याचे वर्म आहे.या विषयावर पूर्वी बुद्ध, महावीर, कृष्ण,कार्ल मार्क्स, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी प्रत्यक्ष कार्य केलेले आहे. अण्णाभाऊ हे त्या महासागराचा एक प्रवाह आहे. अण्णाभाऊ या सर्वच महापुरुषांचे वारसदार आहेत. अण्णाभाऊंना मार्क्सवादी मानणे म्हणजे अण्णाभाऊना सीमित करण्यासारखे आहे. अण्णाभाऊ हे एका समूहाचे नाव आहे, ते एका व्यक्तिपूरते मर्यादित नाही. आमच्यातील अज्ञानामुळे आम्हाला अण्णाभाऊंच्या साहित्याचा अर्थ कळत नाही.म्हणून आम्ही अण्णाभाऊ ना कधी मार्क्सवादी म्हणतो, तर कधी आंबेडकरवादी म्हणतो. सर्व बहुजन हे एकच आहेत, हा विचार आपण मानला तर अण्णाभाऊ ना खऱ्या अर्थाने अभिवादन होईल, असे मला वाटते.
           भिवा कांबळे, पुणे

Post a Comment

0 Comments