कविता:शांत डोक्याने
शांत डोक्याने येथे
रचला जातोय
एक एक डाव
हळूहळू संपवायला
निघाले घटनेतील भीमराव.
रात्र नाही वैऱ्याची
आता दिवसही आहे वैरी
आताच प्रयत्नशील राहा
नाहीतर औलाद होईल
तुझी मुकी बहिरी.
ओरडून सांगतो जगाला
घटना लिहली बापाने
पण टिकवली नाही
त्याच्यां लेकाने
आता आवाज उठवा
कुठेतरी एक मुखाने
शांत डोक्याने नियोजन
आजही आहे कटिबद्ध
हळूहळू हिंदुराष्ट्र
करतील सिद्ध
तू फक्त करत राहशील
घटनेचा बोलबाला
एक एक कलमावर
घालत राहतील घाला
आरक्षण तर संपलेच आहे
आता तुला ते लढवतील
वापर करून तुझा
स्वप्न ते घडवतील
तुझी चळवळ आता तू
पडू देऊ नकोस बंद
एकजूट होऊन सारे
करा यांची पाऊले मंद
लोकशाही टिकविण्यासाठी
आता तूला झटावं लागेल
एकत्र येऊन सर्व पक्षांना
नव्याने पेटावं लागेल
थंड डोक्याने ते
चढवतात तुझ्या
हक्कांवार हल्ला
उद्धवस्त करतात
चळवळीचा किल्ला
तू ही थंड डोक्याने
आता पुन्हा हो एकजूट
दाखव तुझी विखुरलेल्या
पाच बोटांची वज्रमूठ...
जय भीम रमाई...
0 Comments