*भगवान बुद्ध शब्दास*
*विरोध करणे चुकीचे*
*अनिल वैद्य*✍
माजी न्यायाधीश
तथागत म्हणजे
तथ्यांच्या आधारे जो चालतो त्याला तथागत म्हणतात म्हणून तथागत भगवान बुद्ध असेही म्हणतात.
काही लोकांनी *भगवान* शब्दाला विरोध करणे सुरू केले आहे .थोडक्यात असे की,भगवान शब्दाचा अर्थ ज्याचे विकार भग्न किंवा नष्ट झाले त्याला *भगवान* म्हणतात.डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य वाचले असता
*भगवान बुद्ध* असा शब्दप्रयोग खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा केला आहे.एक दोन उदाहरण असे 25 डिसेंबर 1954 ला देहू रोड ,पुणे येथे बुद्ध मूर्ती प्रतिस्थापन करताना .
त्या नंतर 14 जानेवारी1955 ला वरळी येथील बौद्ध धम्म प्रचार समिती मध्ये भाषणात
नंतर अनेकदा.....
पण महत्वाचे म्हणजे 22 प्रतिज्ञेत सुध्दा11 व्या व 12 व्या प्रतिज्ञेत *भगवान* शब्द आहे
धम्म दीक्षेनंतर 15 ऑक्टोबर 1956 च्या नागपूर येथिल व्याख्यानात *भगवान* बुद्ध असा उल्लेख त्यांनी केला .डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी खंड 16 पाली शब्दकोशात भगवा म्हणजे worshipful, venerable, blessed,मराठीत *भगवन्त* असा अर्थ आहे.
भगवान बुद्ध हा शब्द प्रयोग कोणत्याही हिंदू किंवा इतर धर्माच्या भगवान शब्दा सारखा दैवत्त्व ध्वनित करणारा शब्द नाही .तसे असते तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हा शब्दप्रयोग केला नसता.भगवान बुद्ध या शब्दाला कुणी नाहक विरोध करू नये .
( संदर्भ :-डॉ बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे खंड 10 ,पान 17,21,126)
समता प्रकाशन, नागपूर
डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 16 पान 72 ,394 364)
*अनिल वैद्य*
माजी न्यायाधीश
✍✍✍✍✍✍✍(जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 🙏🏽🙏🏽🙏🏽
0 Comments